सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून सहा विषय

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली : सीबीएससीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली : सीबीएससीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे.

सध्या सीबीएससीचे दहावीचे विद्यार्थ्यांना दोन भाषा, समाजशास्त्र, गणित आणि शास्त्र हे विषय शिकविले जातात. सध्या विद्यार्थ्यांना व्हॉकेशनल विषय सक्तीचा नाही, मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून तो सक्तीचा करण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत व्यावसायिक विषय दहावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन करण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहेत. विद्यार्थी जर शास्त्र, समाजशास्त्र आणि गणित यापैकी कोणत्याही एका विषयात अनुत्तीर्ण झाला, तर त्याला व्यावसायिक विषय देऊन पुन्हा परीक्षेला बसविले जाईल, असे मंडळाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची 100 गुणांची परीक्षा असेल, त्यातील 50 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षांचे असतील. एखाद्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 33 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे.

Web Title: Six topics CBSE students from next year