सुतळी बॅाम्बने फुटली कवटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मध्य प्रदेशमध्ये वकीलाच्या कानाजवळ सुतळी बॅाम्ब फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

भोपाळ : दिवाळीत फटाक्यांमुळे अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. मध्य प्रदेशमध्ये वकीलाच्या कानाजवळ सुतळी बॅाम्ब फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातील एका वकीलाच्या बिछान्याजवळ अचानक सुतळी बॅाम्ब फोडला असता, प्रचंड आवाजाने त्याच्या कवटीचा काही भाग फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमित शर्मा (28) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळच्या वेळेस अमित हे आपल्या खोलीत झोपले असताना अचानक त्यांच्या खोलीतून मोठा आवाज आला, त्यामुळे त्यांचा भाऊ अंकित त्यांच्या खोलीत गेला असता
सर्वत्र धूर पसरल्याचे त्याने पाहिले. तसेच सर्वत्र रक्ताचे सडे पसरले असल्याचेही त्याने पाहिले.

दरम्यान पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी येत संपूर्ण तपास केला. तेव्हा त्यांनी तिथून चार सुतळी बॅाम्ब जप्त केले. सध्या पोलिस पुढील तपास करत असून शवविच्छेदनाचा अहवाल अजून मिळालेला नसल्याने अद्याप काही स्पष्ट झालेले नाही.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skull burst due to crackers