यंदा सरासरीइतका पाऊस; स्कायमेटचा अंदाज

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

महिन्यांनुसार पावसाची सरासरी -
जून 111 टक्के (साधारण 163 मिमी)
जुलै 97 टक्के (साधारण 289 मिमी)
ऑगस्ट 96 टक्के (261 मिमी)
सप्टेंबर 101 टक्के (173 मिमी)

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनच्या पाऊसाबाबत स्कायमेट या संस्थेने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीइतका पाऊस होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

'स्कायमेट' या खासगी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल. म्हणजे हा पाऊस 100 टक्के असेल. 

शेतीप्रधान भारतासाठी मॉन्सूनचा पाऊस महत्त्वाचा आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या अंदाजावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव यंदा सप्टेंबरनंतर असेल असे स्पष्ट केल्यानंतर यंदाचा मॉन्सून सरासरीचा असेल असे सांगितले होते. आगामी मॉन्सूनबाबत अंदाज वर्तविलेला नाही. मात्र, स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक असल्याचे चित्र आहे. 

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंन्दूर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. 

महिन्यांनुसार पावसाची सरासरी -
जून 111 टक्के (साधारण 163 मिमी)
जुलै 97 टक्के (साधारण 289 मिमी)
ऑगस्ट 96 टक्के (261 मिमी)
सप्टेंबर 101 टक्के (173 मिमी)

Web Title: Skymet Weather Forecasts Normal Monsoon For India In 2018