पाकवाले म्हणताहेत, आम्ही झोपावे की नाही...

Sleep tight because PAF is awake but pak people worry about india attack
Sleep tight because PAF is awake but pak people worry about india attack

नवी दिल्लीः आम्ही साखर झोपेत असलो की भारत आमच्यावर हल्ला करत आहे. आम्ही रात्रीचे झोपावे की नाही, अशी भिती पाकिस्तानी नागरिकांना वाटत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्या आहेत.

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. आज पहाटे साडे तीनच्या ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादी ठार झाले. पहिला सर्जिकल स्ट्राइकही पहाटेच्या सुमारास करण्यात आला होता.

एका बाजूला पाकिस्तान डिफेन्स ट्विटर हॅण्डलवरुन ‘निवांत झोपा कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’, असे ट्विट करण्यात करते अन् दुसऱया बाजूला आम्ही साखर झोपेत असलो की भारत हल्ला करतोय. आम्ही झोपावे की नाही? असा प्रश्न पाकिस्तानी नागरिक सरकारला करू लागले आहेत.

भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यापासून पाकची झोप उडाली आहे. भारत नाव ऐकले तरी झोप उडते एवढी भीती सर्वसामान्यांमध्ये बसली आहे. पाकिस्तानी लष्करावरतर विश्वासच नाही. आजच्या हल्ल्यानंतर हे खरे ठरले आहे. आम्ही रात्री झोपावे की नाही? असा प्रश्न पडला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com