पाकिस्तानी हवाई दल म्हणालं.. 'निवांत झोपा!' आणि मग..

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. आज पहाटे साडे तीनच्या ही कारवाई करण्यात आली.  यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादी ठार झाले. देशभरात या कारवाईबद्दल भारतीय हवाई दलाचे अभिवनंदन करण्यात येत आहे. सोसल मिडियावरही अनेक मेसेज शेअर होत आहेत. तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एक ट्विटर हॅण्डल चांगलेच चर्चेत आले आहे. हे ट्विटर हॅण्डल अधिकृत नसले तरी त्यांनी केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

भारताने केलेल्या एअरस्ट्राईकच्या तीन तास आधी पाकिस्तान डिफेन्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘निवांत झोपा कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’, असे ट्विट करण्यात आले होते. या ट्विटर हॅण्डलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी या हॅण्डलच्या बायोमध्ये डिफेन्स डॉट पिओके या वेबसाईटचा उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये पुढे पाकिस्तान जिंदाबाद हा हॅशटॅगही वापरण्यात आला.

रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर अवघ्या साडेतीन तासात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. त्यामुळे आता या ट्विटवरुन पाकिस्तानी हवाई दलाला तसेच पाकिस्तानलाही ट्रोल केले जात आहे....

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sleep tight because Pakistan Defence is awake tweet got trolled