भरधाव BMWची कारला धडक; फुटपाथवर झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू

काकांच्या गाडीचा वेग तपासण्यासाठी चालक तरुण गाडी वेगात चालवत होता.
Delhi Accident by BMW
Delhi Accident by BMWSakal

भरधाव वेगात जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यूमुळे झालेल्या अपघातात फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं असून यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झालेत. यात बीएमडब्ल्यूची वॅगन आर गाडीला धडक बसली आणि त्यानंतर ही गाडी फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर पडली. (Two children died in accident involving BMW)

Delhi Accident by BMW
दिल्ली: करोल बागेत भीषण आग; अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या तैनात

१० जून रोजी दिल्लीतल्या लोधी फ्लायओव्हर परिसरात हा अपघात घडला. एक २७ वर्षीय व्यावसायिक आपल्या काकांची नवी बीएमडब्ल्यू (BMW Car accident) कार चालवत होता. कारचा वेग तपासण्यासाठी याने गाडीचा वेग वाढवला. त्यानंतर ही गाडी एका दुसऱ्या वॅगनआर गाडीला धडकली आणि ही वॅगनआर फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर गेली. यामध्ये ८ जण जखमी झाले असून २ चिमुकल्यांचा (Two Children Death) मृत्यू झाला आहे. या प्रकरणातला आरोपी फरार झाला असून अपघातानंतर काही दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.

Delhi Accident by BMW
पुण्यात भीषण अपघात; नवले पुलावर ट्रक उलटला, दोन जखमी

पोलिसांना पहाटे साडेचारच्या सुमारास एक फोन आला, ज्याच्या माध्यमातून या अपघाताची माहिती देण्यात आली. सहा वर्षांची रोशनी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ आमिर याला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर वॅगनआरमधले प्रवासीही या अपघातात जखमी झाले आहे. या अपघाताचा जखमी लोकांव्यतिरिक्त कोणीही साक्षीदार नाही. मात्र जखमी झालेल्या लोकांना या गाडीबद्दल काहीही आठवत नसल्याची माहिती पोलिसांनी (Delhi Police) दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com