भाजप का काम तमाम, जय श्री राम, जय श्री राम!

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

काँग्रेसने भाजपचा तीन राज्यांमध्ये सुपडासाफ केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना अनेक दिवसांनंतर जल्लोष करण्याची संधी मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप का काम तमाम, जय श्री राम, जय श्री राम! अशा घोषणा दिल्या.

नवी दिल्ली : काँग्रेसने भाजपचा तीन राज्यांमध्ये सुपडासाफ केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना अनेक दिवसांनंतर जल्लोष करण्याची संधी मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप का काम तमाम, जय श्री राम, जय श्री राम! अशा घोषणा दिल्या.

भाजपने गेल्या काही दिवसांत अयोध्येतील राम मंदिराचा उपस्थित करत हिंदुत्वाचे राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून राहुल गांधी यांच्या मंदिर भेटीवरही आक्षेप घेतला होता. त्यावर राहुल गांधींनीही आपला मंदिर भेटीचा सिलसिला कायम ठेवला होता.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशात भाजपची अनेक वर्षांची सत्ता गेल्यानंतर काँग्रेस मुख्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Slogans of Congress Party workers