स्मार्ट सिटीसाठी पाडली वारसा इमारत

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

पाटण्यातील पहिले नियोजनबद्ध मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील सुमारे शंभर वर्षांपूवीच्या गोल मार्केटची इमारत स्मार्ट सिटीसाठी पाडण्यात आली.

पाटणा : पाटण्यातील पहिले नियोजनबद्ध मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील सुमारे शंभर वर्षांपूवीच्या गोल मार्केटची इमारत स्मार्ट सिटीसाठी पाडण्यात आली. ऐतिहासिक वारसा असलेली ही इमारत पाटणा महापालिकेने पाडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पाटण्याच्या मध्य भागात असलेली ही अतिशय सुंदर कौलारू इमारत बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या नियोजनेअंतर्गत येथे आता सात मजली व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.

ब्रिटिश सरकारच्या काळात 1912 मध्ये बिहार आणि ओडिशा प्रांतासाठी नवीन राजधानीची आखणी करताना जोसेफ फिअरीस म्युनिंग्ज या स्थापत्यविशारदाने गोल मार्केटची उभारणी केली होती. ऐतिहासिक मूल्य असतानाही ती पाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Smart City Heritage Building was destroyed