मेघालयातील 'त्या' खाणीत दुर्गंध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

शिलाँग : मेघालयमधील जैतिया हिल्स येथील कोळसा खाणीमध्ये अडकून पडलेल्या पंधरा कामगारांच्या बचावासाठी सुरू असलेली मोहीम आज सलग 14 व्या दिवशीही सुरूच होती. या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, त्यांना अद्याप या कामगारांपर्यंत पोचता आलेले नाही. याच खाणीमधून आता दुर्गंध येऊ लागल्याने बचाव पथकातील अधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. 

या साडेतीनशे फूट खोल खाणीमध्ये 70 फुटांपर्यंत पाणी भरले असून ते आता वेगाने बाहेर काढले जाते आहे. मध्यंतरी हे पाणी काढण्यासाठी योग्य क्षमतेचे पंप उपलब्ध होऊ न शकल्याने हे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिक क्षमतेचे पंप येण्यासाठी आणखी चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेरा डिसेंबरपासून हे कामगार या खाणीमध्ये अडकून पडले आहेत. 

"किर्लोस्कर'ची मदतीची तयारी 

इंडोनेशियातील गुहांमध्ये अडकलेल्या बारा मुलांच्या सुटकेसाठी उपकरणे पाठविणाऱ्या किर्लोस्कर कंपनीने मेघालय सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीने म्हटले आहे की, "" आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, खाणींमध्ये अडकलेल्या कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले जाईल याचा आम्हाला विश्‍वास आहे.'' "एनडीआरएफ'च्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शंभर अश्‍वशक्ती एवढी क्षमता असणाऱ्या इंजिनांची मागणी केली असून, त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. 

Web Title: Smell of mining in Meghalaya