स्मोकिंग करत असाल तर हे वाचाच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

धुम्रपान केल्याने आरोग्यावर याचा हानिकारक परिणाम होत असल्याचे अनेकदा समोर आले

नवी दिल्ली : धुम्रपान केल्याने आरोग्यावर याचा हानिकारक परिणाम होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तंबाखू, पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कंपन्यांकडूनही याचा धोका काय आहे, याबाबत सांगितले जात असते. सातत्याने धुम्रपान केल्याने एका व्यक्तीच्या फुफ्फसाची स्थिती अत्यंत खराब झाली होती. त्याचे फुफ्फुस दान करण्यासाठी आले असता ते काळे पडल्याचे दिसले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

चीनमधील 52 वर्षीय व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून धुम्रपान करत होती. त्यामुळे त्याचे लंग टार काळे पडले. त्यामुळे जेव्हा हे फुफ्फुस दुसऱ्या एका रुग्णाला लावण्याचे निश्चित झाले होते. तेव्हा याची सध्याची अवस्था समजली. चीनच्या यूक्सी पिपल्स रुग्णालयाने याचा व्हिडिओही जारी केला आहे. 

तेथील डॉक्टर चेन झिएंगु आणि त्यांची ट्रान्सप्लँट टीम या फुफफ्साची तपासणी करत आहे. चेन झिएंगु यांनी सांगितले, की ज्या व्यक्तीने हे फुफ्फुस दान केले, त्या व्यक्तीचे ब्रेन डेड झाले होते. त्यामुळे आता या फुफ्फुसाची ही अवस्था पाहिल्यानंतर हे कोणत्याही शरीरात लावता येणार नसल्याचे सिद्ध झाले. या ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसाला लंग कॅल्सिफिकेशन, बुलॉस लंग आणि पुलमॉनरी एम्फीसेमा यासारखा आजार झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoker lungs video viral chain smoker black lungs