राहुल गांधींना जीएसटी कधीपासून कळू लागली? ; स्मृती इराणींनी उडवली खिल्ली

महेश काशीद
शनिवार, 28 एप्रिल 2018

केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज पुन्हा एकदा खिल्ली उडवली. राहुल गांधी यांना कधीपासून जीएसटीचा (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) विषय समजू लागला आहे, अशी खोचक टीका केली.

बेळगाव : केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज पुन्हा एकदा खिल्ली उडवली. राहुल गांधी यांना कधीपासून जीएसटीचा (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) विषय समजू लागला आहे, अशी खोचक टीका केली.

केएलई येथील जेएनएमसी सभागृहात विद्यार्थाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इराणी बोलत होत्या. यावेळी एका विद्यार्थिनीने राहुल गांधी म्हैसूर येथील एका कार्यक्रमात 5 स्लॅबमध्ये जीएसटी विभागली असून, आमचे सरकार आल्यानंतर जीएसटी एकच स्लॅबमध्ये असेल, असे म्हटले आहे.
त्यावर इराणी यांनी राहुल गांधी यांना जीएसटी प्रक्रिया समजली आहे? असे कुतूहलाने विचारून एकवेळ तुम्हाला जीएसटी कळेल.

पण, राहुल यांना जीएसटी समजून घेणे कठीण जाईल. मुळात मी राहुल गांधी यांनी जीएसटीवर भाष्य केले असल्याचे ऐकून चकित झाल्याचे सांगून राहुल जीएसटीबद्दल अजाण असल्याचा दावा इराणी यांनी केला.

Web Title: Smriti Irani Criticizes Rahul Gandhi on GST issue