स्मृती इराणींनी केला तलवार डान्स की सगळे बघतंच राहिले!

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

विद्यार्थीनींसोबत स्मृती ठेक्यात नृत्य करत आहेत. त्यांचा हा अंदाज बघून नेटकरी भारावून गेले आहेत. लक्ष्य चित्रपटातलं 'कंधो से मिलते है कंधे' या गाण्यावर त्यांनी हा तलवार डान्स केलाय.

गांधीनगर : गेल्या अनेक दिवसात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी चर्चेत आल्या नाहीत! पण त्या पुन्हा एकदा एका व्हिडिमुळे चर्चेत आल्यात. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. भाजपच्याच एका कार्यकर्त्याने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ बघून तुमचा विश्वासच बसणार नाही की, या स्मृती इराणी आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गुजरातमधील भाव नगर येथील स्वामी नारायण गुरूकुलमधील कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. येथे मूर्ती स्थापनेचा महोत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात मंत्री स्मृती इराणी यांनी चक्क हातात तलवार घेऊन डान्स केलाय. इतर विद्यार्थीनींसोबत स्मृती ठेक्यात नृत्य करत आहेत. त्यांचा हा अंदाज बघून नेटकरी भारावून गेले आहेत. लक्ष्य चित्रपटातलं 'कंधो से मिलते है कंधे' या गाण्यावर त्यांनी हा तलवार डान्स केलाय.

'मर्दानी 2'वर लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले...

स्वामी नारायण गुरूकुलमध्ये सध्या मूर्ती स्थापना महोत्सव सुरू आहे. यात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्मृती इराणींना निमंत्रित करण्यात आले होते. स्मृती राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री होत्या, त्यामुळे त्यांनी अगदी सहजरित्या सुंदर डान्स केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smriti Irani danced at Bhavnagar School