Smriti Irani Net Worth : अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या स्मृती इराणींची संपत्ती ऐकाल तर गारच व्हाल l Smriti Irani Net Worth Birthday 2023 total income wealth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani Net Worth

Smriti Irani Net Worth : अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या स्मृती इराणींची संपत्ती ऐकाल तर गारच व्हाल

Smriti Irani Birthday 2023 : क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या तुलसी बहूचा जन्म २३ मार्च १९७६ ला नवी दिल्ली इथे झाला. स्मृती इराणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली. त्यानंतर त्या २००३मध्ये राजकारणात उतरल्या. अभिनय क्षेत्रात त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली त्यांचं राजकारणातलं करिअर पण तेवढंच दमदार राहिलं.

स्मृती इराणी मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्री आहेत. काँग्रेसची मक्तेदारी असणाऱ्या अमेठीत त्यांनी राहुल गांधींना हरवत तिथल्या खासदार म्हणून निवडून आल्या.

स्मृती इराणी यांचे पती एक पारसी व्यावसायिक आहेत. पण स्मृती यांनी आपल्या हिमतीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्या कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. ही संपत्ती त्यांनी अभिनयाच्या जोरावर कमवली आहे.

स्मृती इराणी यांचे टीव्ही कार्यक्रम

अभिनय क्षेत्रात असताना त्यांनी मालिकांबरोबर काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेच्या तुलसी आणि रामायण मालिकेतील सितेच्या भूमिकेने मिळवून दिली. स्मृतीने ये है जलवा आणि सावधान इंडिया सारखे शोजपण होस्ट केले होते.

स्मृती इराणी यांचे राजकीय करिअर

त्यांनी २००३ मध्ये भारतीय जनता पक्ष जॉइन केला. २००४ मध्ये त्यांना महाराष्ट्र यूथ विंगची उपाध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांच वर्षी त्यांनी दिल्ली चांदणी चौक इथून कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणुक लढवली. पण त्या हरल्या. २०१४ मध्ये भाजपने त्यांना राहुल गांधी विरोधात अमेठीचं तिकीट दिलं. यावेळी पण त्या हरल्या. पण मोदी सरकारने त्यांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवलं. २००९ मध्ये त्या पुन्हा राहुल गांधी विरोधात अमेठीतून निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या.

स्मृती इराणी यांचं उत्पन्न

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार यांचं वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे. स्मृती इराणी यांनी घोषित केलं होतं की, २०१७-१८ मध्ये त्यांचं उत्पन्न ४६ लाख ५७ हजार आहे.

स्मृती इराणी यांचं कार कलेक्शन

त्यांच्याकडे फार महागड्या गाड्या नाहीत. १३.१४ लाखाची गाडी त्यांच्याकडे आहे.

एकूण संपत्ती

वृत्तानुसार स्मृती इराणी या ७ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहेत.

घर

स्मृती या आपल्या पती आणि मुलांसोबत राहतात. त्यांचा एक फ्लॅट गौरीगंज इथे आहे.