स्कूल बॅगेत कोब्रा घेऊन विद्यार्थी चालला एक किलोमीटर

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

बंगळूरः विद्यार्थ्याच्या बॅगेमधून कोब्रा बाहेर आला अन् शाळेत एकच गोंधळ उडाला. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विद्यार्थी चालत आला, दरम्यानच्या काळात कोब्रा बॅगेतून बाहेर न आल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

किष्णागिरी जिल्ह्यातील कमराजानगर गावातील सरकारी शाळेत विद्यार्थी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेपासून त्याचे घर एक किलोमीटर अंतरावर आहे. शाळेमध्ये आल्यानंतर त्याने स्कूल बॅगेमधून पुस्तके बाहेर काढण्यासाठी हात घातला असता फूस आवाज आल्यामुळे त्याने तत्परतेने बॅग बाजूला केली. यावेळी बॅगेमधून कोब्रा बाहेर आल्यामुळे एकच धावपळ उडाली. शिक्षकांनी प्रसांगवधान दाखवून विद्यार्थ्यांना एका बाजूला केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यानच्या काळातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॉयरल झाला आहे.

शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या बॅगेत कोब्रा त्याच्या घरी असतानाच शिरला. परंतु, एक किलोमीटर चालत असताना कोब्रा बाहेर न आल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Snake in bag boy walks 1km to school