...अन् 'व्हीव्हीपॅट'मधूनच निघाला साप! 

...अन् 'व्हीव्हीपॅट'मधूनच निघाला साप! 

कन्नूर (केरळ) : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी कन्नूर मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू असताना एका मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये अचानक साप निघाला. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया स्थगित करावी लागली. 

कन्नूर मतदारसंघातील मय्यिल कंडक्काई येथे एका मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशिनमधून एक लहान साप बाहेर आल्याने निवडणूक अधिकारी आणि मतदार घाबरले. मात्र तेथून सापाला तात्काळ बाहेर काढले. तोपर्यंत मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर मतदान सुरू झाले.

कन्नूर मतदारसंघातून विद्यमान खासदार माकप-एलडीएफचे पी. के. श्रीमती, कॉंग्रेस यूडीएफचे के. सुरेंद्रन आणि भाजप-रालोआचे उमेदवार सी. के. पद्मनाभन मैदानात आहेत. आज सकाळी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com