हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, उत्तरेत थंडी वाढली

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशातील पर्वतांवर बर्फवृष्टी झाली असून, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, चंडीगड, उत्तर राजस्थान, पंजाब आणि दिल्लीत धुक्याची स्थिती आहे. यामुळे उत्तर भारतात आलेली थंडीची लाट वाढली असून, आणखी आठवडाभर ही लाट कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात तीव्र थंडीपासून किंचित दिलासा मिळेल असे दिसते. रविवारी रात्री येथे उणे 2 अंश सेल्सियस एवढे तापमान होते. येथील किमान तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. तसेच, लडाखमधील तापमानात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. 
उत्तरेतील राज्यांमध्ये असलेल्या धुक्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या संपूर्ण वाहतुकीवर परिणाम होईल असे सांगण्यात आले.

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तरप्रदेश या परिसरात आठवड्याच्या उत्तरार्धात थंडी आणखी वाढेल असा अंदाज आहे. 

शिमला अद्याप पूर्णपणे बर्फाच्छादित झाले नसले तरी येथील तापमान 3.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. येथील पर्यटक हिमक्रीडांचा आनंद लुटत आहेत. 
राजधानी दिल्लीमध्ये दुपारपर्यंत धुके राहिल्याने सुमारे 80 रेल्वेगाड्या उशिरा धावल्या, तर इतर 20 रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.
 
Web Title: snowfall in himachal mountains, cold wave in north india