...म्हणून कुमारस्वामींचा शपथविधी सोमवारी नाही

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

जेडीएसच्या नेत्यांनी कुमारस्वामी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. मात्र, राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्याने पक्षाकडून शपथविधी पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता कुमारस्वामी येत्या बुधवारी (ता.23) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी निश्चित झाली आहे. कर्नाटकात शनिवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर कुमारस्वामींचा शपथविधी सोमवारी घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांची पुण्यतिथी (21 मे) असल्याने कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा बुधवारी घेण्यात येणार आहे.

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर काल (शनिवार) रात्री उशिरा राज्यपाल वाला यांनी जेडीएसचे विधिमंडळ नेते कुमारस्वामी यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर जेडीएसच्या नेत्यांनी कुमारस्वामी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. मात्र, राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्याने पक्षाकडून शपथविधी पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता कुमारस्वामी येत्या बुधवारी (ता.23) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

Rajiv gandhi

दरम्यान, सत्ता स्थापनेच्या निमंत्रणापूर्वी कुमारस्वामी यांनी येत्या 24 तासांत बहुमत सिद्ध करू असे सांगितले होते. तसेच राज्यपाल वाला यांनी कुमारस्वामी यांनादेखील 15 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. 

Web Title: So That Kumaraswamy swearing ceremony is not on Monday