सत्यार्थींच्या घरातून नोबेल पुरस्काराची प्रतिकृती चोरीला

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कालका येथील अरावली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून नोबेल पुरस्काराची प्रतिकृती, दागिने आणि रोकड लांबवली आहे.

नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यर्थी यांच्या दिल्लीतील घरी सोमवारी रात्री चोरी झाली असून, चोरट्यांनी नोबेल पुरस्काराची प्रतिकृती पळवून नेली आहे.

सत्यार्थी यांच्या घरी झालेल्या चोरीप्रखरणी कालकाजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यार्थी हे बालहक्क चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना 2014 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. बचपन बचाव आंदोलनाचे ते संस्थापक आहेत. बाल कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम ही संस्था करते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालका येथील अरावली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून नोबेल पुरस्काराची प्रतिकृती, दागिने आणि रोकड लांबवली आहे. कुलुप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सत्यार्थी हे सध्या परदेशात आहेत.

Web Title: Social activist Kailash Satyarthi's Delhi home burgled, his Nobel Prize stolen