सुधा भारद्वाज यांच्या अर्जावर सुनावणीस कोर्टाचा नकार

Sudha_20bharadwa
Sudha_20bharadwa

नवी दिल्ली- कोरेगाव-भीमा प्रकरणी दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपी सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल सुधा भारद्वाज यांच्या हंगामी जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. भारद्वाज यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश यू.यू.ललित आणि अजय रस्तोगी यांनी भारद्वाज यांच्या पीठाने सुनावणीस नकार दिल्याने भारद्वाज यांनी अर्ज मागे घेतला.

भारद्वाज यांच्या वकिल वृंदा ग्रोवर यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या सुधा भारद्वाज यांच्यावरचे आरोप अद्याप निश्‍चित झालेले नाहीत. याचिकाकर्त्याच्या घरातून कोणतिही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या नाहीत. याचिकाकर्त्यास मधुमेह आणि अन्य आजार असल्याने अनेक चाचण्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे हंगामी जामीन मिळावा. आजाराचे निदान होताच पुन्हा हजर होईन, असे जामीन अर्जात म्हटले. या वेळी न्यायालयाने जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. तपासणीसाठी न्यायालयाकडे आग्रह केला आहे, परंतु तुरुंगाच्या रुग्णालयात चाचण्या होऊ शकल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले. तेव्हा आपल्याकडे चांगले मुद्दे असताना आपण नियमित जामीनासाठी अर्ज का करत नाही, अशी न्यायालयाने विचारणा केली. एकतर अर्ज मागे घ्या अन्यथा आम्ही रद्दबातल करु. आमच्या मते, तुम्ही नियमित जामीनासाठी अर्ज दाखल करावा, असे न्यायालयाने सांगितले. यानुसार अर्ज मागे घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com