मोदींच्या फिटनेस चॅलेंजला नेटकऱ्यांचे आव्हान

गुरुवार, 14 जून 2018

मोदींच्या फिटनेस व्हिडिओची आणि फोटोंची सोशल मिडियाच खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यांचे फिटनेस चॅलेंजचे फोटो फोटोशॉप करुन सोशल मिडियात व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर, त्या फोटोमध्ये हास्यास्पद बदल केले आहेत. एकप्रकारे मोदींच्या फिटनेस चॅलेंजला नेटकऱ्यांनी दिलेले हे मोठे आव्हान आहे.

नवी दिल्ली - मोदींच्या फिटनेस व्हिडिओची आणि फोटोंची सोशल मीडियामध्ये खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यांचे फिटनेस चॅलेंजचे फोटो फोटोशॉप करुन सोशल मिडियात व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर, त्या फोटोमध्ये हास्यास्पद बदल केले आहेत. एकप्रकारे मोदींच्या फिटनेस चॅलेंजला नेटकऱ्यांनी दिलेले हे मोठे आव्हान आहे.

विराट कोहलीने आपल्या ट्विटरवरून #FitnessChallenge हे हॅशटॅग वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यायामाचा व्हिडीओ शेअर करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर काल (ता.13) सकाळी पंतप्रधान मोदींनी ते आव्हान स्विकारून पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, राष्ट्रकुल पदकविजेती टेनिसपटू मनिका बत्रा आणि 40 पेक्षा अधिक भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना आव्हान दिले. त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ आणि फोटोंची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी त्यांच्या या फिटनेस चॅलेंजविषयी सकारत्मकता दर्शवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रत्युत्तर देतना आपल्याला स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याच्या फिटनेसची जास्त काळजी असल्याचे म्हटले होते. तर हे हास्यास्पद आणि विचित्र असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते. त्याचबरोबर, अभिनेते अनुपम खेर यांनी सकारत्मकता दाखवताना पंतप्रधान मोदी तुम्ही रॉकस्टार असल्याचे ट्विट केले होते. अभिनेता अनिल कपूर यानेही नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करुन त्यांची व्हिडिओबद्दल स्तुती केली होती.

 

Web Title: social media Challenge to Modi's Fitness