केजरीवालांची हॅटट्रीक अन् रोहित पवारांचं योगदान; असं आहे कनेक्शन!

वृत्तसंस्था
Tuesday, 18 February 2020

रोहित पवार व केजरीवाल यांच्यामध्ये सोशल मीडियाबाबबत एक कनेक्शन आहे... केजरीवालांच्या विजयात थोडा का होईना रोहित पवारांचा सहभाग आहे.

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणूकीत विजय मिळवत हॅटट्रीक केली. तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोशल मीडियावर तर यावेळी आपने धूम केली होती. 'लगे रहो केजरीवाल' हे त्यांचं कॅपेन साँग तर प्रत्येक दिल्लीकराच्या घरात पोहोचलं होतं. या सर्वामागे होती ती केजरीवालांची सोशल मीडिया टीम! या टीममुळेच ते इतका मोठा विजय साध्या करू शकले. पण तुम्हाला माहीत आहे का, रोहित पवार व केजरीवाल यांच्यामध्ये सोशल मीडियाबाबबत एक कनेक्शन आहे... केजरीवालांच्या विजयात थोडा का होईना रोहित पवारांचा सहभाग आहे.

कादंबरीतून उलगडलं कोरोनाचं हे धक्कादायक रहस्य!

आम आदमी पक्षाचे सोशल मीडिया सांभाळायला मोठी फौज तैनात होती. यापैकीच एक म्हणजे कन्सेप्चुअल मीडिया कंपनीचे प्रमुख अमित राज सिंग. अमित राज सिंग यांच्याकडे आपचे मुख्यतः TikTok, Helo आणि Like चे अकाऊंट होते. या सोशल मीडिया प्लॅटफोर्म्सवर अकाऊंट उघडण्यापासून सुरवात होती. फर्स्ट टाईम व्होटरपर्यंत पोहोचण्यासाठी आप या सर्व सोशल मीडिया अॅपवर असणे आवश्य होते. अमित राज यांनी यशस्वीमपणे तरूण मतदारांना आपकडे खेचले. 

Image result for amit raj singh aap
अमित राज सिंग

अमित राज सिंग यांना आपच्या सोशल मीडियाची संधी मिळण्यामागे रोहित पवारांचा मोठा हात आहे, कारण रोहित पवार व बहुजन विकास आघाडीचे सोशल मीडियाचे काम हे अमित राज सिंग यांनी केले होते. आणि हेच काम बघून 'आप'ने त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमित राज सिंग यांनी केजरीवाल व दिल्लीचे भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार मनोज तिवारी यांचा संपूर्ण अभ्यास केला व त्याप्रकारे सोशल मीडियासाठी योजना आखत गेले. अमित यांनी आजपर्यंत ज्यांच्यासाठी काम केले जवळपास त्या सगळ्यांचाच विजय झाला आहे. रोहित पवार व वंचित बहुजन आघाडीसाठी काम केल्याने या दोघांचेही आप विजयाशी कनेक्शन आहे. या निवडणूकीत आपने ६२ जागा जिंकल्या तर भाजपने ८ जागा मिळवल्या. काँग्रेसला शून्यावरच समाधान मानावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Media expert Amit Raj Singh worked for Kejriwal as well as Rohit Pawar