अपेक्षा होती दाऊद किंवा मसूदची; घोषणा झाली वेगळीच..!

Narendra-Modi
Narendra-Modi

नवी दिल्ली - 'आज सकाळी, मी देशाला उद्देशून भाषण करणार आहे', अशी घोषणा मोदी यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष मोदींच्या घोषणेकडेच लागले होते. नोटाबंदीपासून मसूद अजहरपर्यंतच्या सर्व शक्यतांवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली. परंतु, मोदींनी देशाला संबोधल्यानंतर सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला आहे.

आज सकाळी (27 मार्च) भारताने एक मोठी कामगिरी केली असून, अंतराळातील एलईओ हा उपग्रह नष्ट करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. भारतासाठी हा गर्वाचा क्षण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशा संबोधतांना सांगितले. याबद्दल आनंद असला तरी मोदी मसूद अजहर किंवा दाऊदला परत आणणार असल्याची चर्चा असल्याने त्यांच्या भाषणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, मोदींच्या भाषणाआधी ट्विटरवर दाऊदचा ट्रेंड देखील सुरु झाला होता. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण कारकिर्दीमध्ये 'शिस्तबद्ध' म्हणूनच ओळख आहे. पण त्यांनी आज (बुधवार) भाषणाची नियोजित वेळ चुकवली आणि संपूर्ण देशाला आणखी काळजीत पाडला होता. त्यामुळेच मोदी नक्की काय घोषणा करणार याबद्दल विविध अंदाज बांधण्यात येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com