सोशल मीडियातून 'द्वेष' पसरवू नका : मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केले. हा मुद्दा एखाद्या विचारसरणीचा नसून, सभ्य समाजाला अशा प्रकारचे वर्तन शोभा देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केले. हा मुद्दा एखाद्या विचारसरणीचा नसून, सभ्य समाजाला अशा प्रकारचे वर्तन शोभा देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, "समाजाला बळकट करणाऱ्या आणि सकारात्मक बातम्यांच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. हल्ली दोन कुटुंबांतील संघर्ष "नॅशनल न्यूज' होते. हल्ली लोक काही तरी चुकीचे पाहतात आणि ऐकतात, पुढे तेच फॉरवर्ड केले जाते. यामुळे समाजाचे किती नुकसान होते आहे, हे कोणालाच समजत नाही. हा प्रश्‍न एखादा राजकीय पक्ष अथवा विचारधारेपुरता मर्यादित नसून तो सव्वाशे कोटी भारतीयांचा आहे. प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा द्वेष पसरू नये, याची खबरदारी घ्यायला हवी.'' 

"स्वच्छता अभियान' हे केवळ भौतिक स्वच्छतेपुरते मर्यादित नसून, यामध्ये मनाची स्वच्छताही गृहीत धरण्यात आली आहे. चांगल्या गोष्टी आपापसांत शेअर करण्यासाठी आपण लोकांनाही प्रवृत्त करायला हवे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Social media should not be used to spread dirt says PM Modi