सॉफ्टवेअर 'हँग' एअर इंडिया 'जॅम'

वृत्तसंस्था
रविवार, 28 एप्रिल 2019

भारतीय हवाई वाहतूक कंपनी "एअर इंडिया'च्या "चेक-ईन-सॉफ्टवेअर'मध्ये बिघाड झाल्याने आज शेकडो प्रवाशांना जगभरातील असंख्य विमानतळांवर अडकून पडावे लागले. तब्बल सहा तास हा गोंधळ सुरू होता, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपनी "एअर इंडिया'च्या "चेक-ईन-सॉफ्टवेअर'मध्ये बिघाड झाल्याने आज शेकडो प्रवाशांना जगभरातील असंख्य विमानतळांवर अडकून पडावे लागले. तब्बल सहा तास हा गोंधळ सुरू होता, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या सॉफ्टवेअरचे काम "अटलांटा'मधील "एसआयटीए' या कंपनीकडे आहे. आज पहाटे तीन ते सकाळी नऊ दरम्यान या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना बोर्डिंग पासेस मिळू शकले नाहीत. त्यामुळे ते जगभरातील विविध विमानतळांवर अडकून पडले होते. या गोंधळामुळे अनेक विमानांच्या उड्डाणालाही काही तासांचा विलंब झाला होता. सध्या या सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला खेद असल्याचे "एअर इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्‍वनी लोहानी यांनी सांगितले.

आज दिवसभरातील विमानांची उड्डाणे सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असून, काही विमानांच्या उड्डाणामध्ये मात्र विलंब होईल. हा विलंब देखील साधारणपणे दोन तासांचा असेल. कारण सकाळी संपूर्ण यंत्रणाच कोलमडली होती, असे त्यांनी नमूद केले. 

या विमानतळांवर अडचणी 

"एअर इंडिया'कडून पॅसेंजर सर्व्हिसेस सिस्टीमचा वापर केला जातो, आज त्यांच्याकडूनच ही संपूर्ण यंत्रणाच मेंटेनन्ससाठी घेण्यात आली होती, या वेळी यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ती योग्य पद्धतीने काम करत नव्हती. दिल्लीसारख्या बड्या विमानतळांवर यंत्रणेमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते, असेही लोहानी यांनी स्पष्ट केले. 
....... 
155 
विमानांच्या 
उड्डाणास विलंब 
.......... 
18 
विमानांच्या 
वेळेत बदल 
....... 

तासांपेक्षा अधिक 
बिघाडाचा कालावधी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Software Hang and Air India Jam