सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी 22 आरोपी दोषमुक्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई- सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं हा निकाल दिला आहे.  सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यानं आरोपींना या प्रकरणातून मुक्त करण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटले. जर कोणीही जबाब देत नसेल तर यामध्ये पोलिसांचा दोष नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. 

सोहराबुद्दीन शेख आणि त्याची बायको कौसर बी तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तुलसीराम प्रजापती या तिघांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. 2005 मध्ये सोहराबुद्दीन व त्याच्या पत्नीचा चकमकीत मृत्यू झाला होता. तर 2006 मध्ये तुलसीराम प्रजापतीचा चकमकीत मृत्यू झाला होता. प्रजापती हा सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील साक्षीदार होता. या प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला. आज (ता.21) शुक्रवारी या खटल्यात न्यायालयाने निर्णय दिला.

सरकारी यंत्रणा आणि वकिलांनी अथक मेहनत घेतली परंतु, समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. तसेच साक्षीदारांनीही साक्ष फिरवली. साक्षीदारच जर बोलणार नसतील तर यात सरकारी वकिलांची आणि पोलिसांची चूक नाही, असे मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवले.

दरम्यान, सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर 2014 मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.

Web Title: Sohrabuddin Encounter Not Fake, Says Court, All Accused Cleared