खुशखबर! मोदी सरकारचं गिफ्ट; उचललं महत्त्वाचं पाऊल

खुशखबर! मोदी सरकारचं गिफ्ट; उचललं महत्त्वाचं पाऊल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने नवी मृदा आरोग्य कार्ड योजना आणली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्ष आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून असंख्य तरुण ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना करू शकतात.

प्रयोगशाळा स्थापन करण्यास 5 लाखांचा खर्च

प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी जवळपास 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्चापैकी 75 टक्के म्हणजे 3.75 लाख रुपये मोदी सरकार देणार आहे, याचा सर्वाधिक फायदा तरुण शेतकऱ्यांना होणार आहे. 

या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत कृष्णा सहकारी समिती, कृषक गट, स्वयंसहाय्यता गट किंवा कृषक उत्पादक संघटनेने या प्रयोगशाळेची स्थापना केल्यास अशा लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com