हुतात्मा भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

कुपवाडा जिल्ह्यातील मच्छली सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार सुरु होता. आज (शनिवार) पहाटेपर्यंत गोळीबार सुरुच होता.

श्रीनगर - कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याने ज्याप्रमाणे अमानवी कृत्य केले होते. तसेच काही शुक्रवारी रात्री गोळीबारात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाबाबत केल्याचे समोर आले आहे. सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या शरीराची छिन्नविछिन्न अवस्था केल्याचे समोर आले आहे.

लष्कराच्या प्रवक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील मच्छली सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार सुरु होता. आज (शनिवार) पहाटेपर्यंत गोळीबार सुरुच होता. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी भारतीय जवानाची हत्या केली आणि त्याच्या शरिराचे तुकडे केले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले. दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानेही गोळीबार सुरु ठेवला. भारतीय जवानांनाही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

मच्छिल सेक्टरमध्ये हुतात्मा झालेल्या भारतीय जवानाचे नाव मनजीतसिंग असे होते. तो 17 व्या शिख रेजिमेंटचा जवान होता. दहशतवाद्यांच्या या कृत्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना माहिती देण्यात आली आहे. भारतीय जवानांनी पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

Web Title: Soldier beheaded in machil sector in north kashmir