कुलगाममधल्या चकमकीत जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, कुलगाममधल्या खुदवानी भागात दहशतवादी घुसल्याची माहिती सकाळीच मिळाली होती, त्याप्रमाणे लष्काराने शोधमोहिम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान गोळ्यांचे आवाज आले व चकमक सुरू झाली. ही चकमक अजूनही चालू आहे व काही स्थानिकांनी यात अडथळा यावा यासाठी लष्करावर दगडफेकही केली. 

श्रीनगर : दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या व दहशतवाद्यांच्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे, तर एक स्थानिक नागरिक ठार झाला आहे. ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जवानाला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्या पूर्वीच तो मृत्यूमुखी पडल्याचे समजते. तसेच जखमी नागरिकाला अनंतनागमधील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव शारजील अहमद शेख (वय 20) असल्याचे लष्कर व जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, कुलगाममधल्या खुदवानी भागात दहशतवादी घुसल्याची माहिती सकाळीच मिळाली होती, त्याप्रमाणे लष्काराने शोधमोहिम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान गोळ्यांचे आवाज आले व चकमक सुरू झाली. ही चकमक अजूनही चालू आहे व काही स्थानिकांनी यात अडथळा यावा यासाठी लष्करावर दगडफेकही केली. 

Web Title: a Soldier a civilian killed in Kulgam encounter in Kashmir gunbattle on