Firing News : दिल्लीत जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier Firing colleagues

दिल्ली : जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील हैदरपूर प्लांटमध्ये तैनात असलेल्या जवानाने (Soldier) तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. ही घटना सोमवारी (ता. १८) घडली. या घटनेत दोन जवान शहीद झाले तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. किरकोळ भांडणानंतर आरोपी जवानाने साथीदारांवर गोळीबार केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. लान्स नाईक प्रवीण रॉय (३२) अशी आरोपी जवानाचे नाव आहे. पिंटो नामग्याल व धनहांग सुब्बा अशी शहीद जवानांची नावे आहेत.

पिंटो कमांडर पदावर तर सुब्बा हवालदार पदावर होते. घटनेनंतर प्रवीणने स्वत: फोन करून प्लांटच्या बॅरेकमध्ये आपल्या साथीदारांना गोळ्या घातल्याचे सांगितले. पोलिसांनी शहीद जवानांचे (Soldier) मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर अन्य एका जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: खासदारांबाबत दीपक केसरकरांचे मोठे विधान; म्हणाले...

मागच्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) अशीच एक घटना समोर आली होती. लष्कराच्या प्रादेशिक सैन्याच्या जवानाने पूंछच्या सुरनकोटमध्ये साथीदारांवर गोळीबार केला होता. या घटनेत दोन जवान शहीद झाले तर दोघे जखमी झाले. यानंतर या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

याचवर्षी मार्चमध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्येही अशीच घटना घडली होती. पश्चिम बंगालमधील सागरपारा येथे बीएसएफच्या ११७ बटालियनमधील बीएसएफचे मुख्य हवालदार एचजी शेखरन यांच्यावर चीफ कॉन्स्टेबल जॉन्सन टोप्पोने गोळ्या झाडल्या. नंतर त्याने सर्व्हिस रायफलने स्वतःवरही गोळी झाडली. दोघांनाही तात्काळ सागरपारा येथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Web Title: Soldier Firing Colleagues Two Died Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathdelhisoldiers
go to top