रक्तदानासाठी जवानांनी सोडला रोजा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

श्रीनगर - "सीआरपीएफ'च्या दोन जवानांनी एका महिलेला रक्तदान करण्यासाठी रमजाननिमित्त धरलेला उपवास (रोजा) सोडल्याची घटना काश्‍मीरमध्ये समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीसाठी सीआरपीएफने "मदतगार' हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वीच किश्‍तवाडमधील रहिवासी अनिल सिंह यांनी सीआरपीएफला मदतीसाठी साद घातली होती.

अनिल सिंह यांची बहीण पूजा ही कर्करोगाने ग्रस्त असून, तिच्यावरील उपचारासाठी रक्ताची गरज होती. ही बाब समजल्यानंतर मुदसीर रसुल भट आणि मोहंमद अस्लम मीर या जवानांनी आपला रोजा सोडत रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. सीआरपीएफच्या रक्तदानासाठी असलेल्या पथकात संजय पासवान आणि रामनिवास यांचाही समावेश असून, त्यांनीही सदर महिलेला रक्तदान केले. 
 
Web Title: soldier left rosa for the blood donation