मॉन्सून देशाच्या उंबरठ्यावर..!

monsoon
monsoon

पुणे : मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. 28) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता. 27) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज (ता. 28) अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. 

मॉन्सूनने शुक्रवारी (ता. 25) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मॉन्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला होतो. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरीन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. रविवारपर्यंत मालदीव-कोमोरीनचा संपूर्ण भाग, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. 30) मॉन्सून केरळात दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र -
केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. 27) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते सोमवारीही कायम आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ‘मेकुणू’ वादळ निवळून गेले असून, सौदी अरेबिया आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com