विवाहितांसाठी कोणी घर देता का घर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पालकांशी चांगले संबंध असताना घरात रहायला आल्यावर हयातभर घरात ठेवणे पालकांसाठी बंधनकारक नाही. जर पालकांनी स्वकमाईने घर घेतले असेल, तर त्यांची मुले विवाहीत असो किंवा अविवाहीत त्यांना आईवडिलांच्या इच्छेविना घरात राहता येणार नाही. जर ते तसे राहत असतील तर ते बेकायदेशीर मानले जाईल. 

विवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाने विवाहितांना स्वतःचे घर करण्याशिवाय अन्यथा आई-वडीलांचा योग्यरित्या सांभाळ करण्याशिवाय तिसरा पर्यायच उरला नाही. जर घर पालकांनी स्वकमाईने घेतले असल्यास केवळ त्यांच्या दयेवरच मुले त्या घरात राहू शकतात, असे न्यायालयाने म्हटल्याने विवाहितांवर कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ येऊ शकते.

पालकांशी चांगले संबंध असताना घरात रहायला आल्यावर हयातभर घरात ठेवणे पालकांसाठी बंधनकारक नाही. जर पालकांनी स्वकमाईने घर घेतले असेल, तर त्यांची मुले विवाहीत असो किंवा अविवाहीत त्यांना आईवडिलांच्या इच्छेविना घरात राहता येणार नाही. जर ते तसे राहत असतील तर ते बेकायदेशीर मानले जाईल. 

दिल्लीतील एका प्रकरणावर न्यायालयाने हा निर्णय घेतला असला तरी समाजातील प्रत्येक व्यक्तीला तो लागू होणारा आहे. न्यायालयाला असे निर्णय घेण्याची वेळ का आली? यासाठी आपणच जबाबदार आहोत का? आई-वडील व मुलांमधील संबंध दुरावले आहेत का? लग्नानंतर मुले बदलतात हे खरंच येथे लागू होते का? वृद्धापकाळात मुले दुर्लक्ष करतात? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. याविषयी आपली मते काय आहेत, कळवा आम्हाला प्रतिक्रियांच्या माध्यमातून...

Web Title: Son has no legal right in parents' house, can stay at their mercy