राष्ट्रवादीच्या आमदारांना सोडवून आणणारी हरियानाची वाघीण!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

राष्ट्रावादीच्या हरियानात लपवून ठेवलेल्या आमदारांना परत आणणे मोठे काम होते... कोणी या आमदारांना परत आणलं, कसं आणलं, भाजपच्या गोटातून हे आमदार कसं निसटले यामागे एक सूत्रधार होती. कोण होती ही राष्ट्रवादीची हरियानातील सूत्रधार?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रावादीच्या हरियानात लपवून ठेवलेल्या आमदारांना परत आणणे... कोणी या आमदारांना परत आणलं, कसं आणलं, भाजपच्या गोटातून हे आमदार कसं निसटले यामागे एक सूत्रधार होती. कोण होती ही राष्ट्रवादीची हरियानातील सूत्रधार?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्रात शपथ घेत होते, त्यावेळी हरियानात फार मोठ्या घडामोडी घडत होत्या. हरियानातल्या गुडगावमधील ओबेरॉय हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील यांना भाजपने कैद करून ठेवले होते. यांना सुखरूप मुंबईला परत आणणारी राष्ट्रवादीची एक वाघीण होती. राष्ट्रवादीच्या हरियानामधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा सोनिया दुहानने राष्ट्रवादीच्या या सर्व आमदारांना भाजपच्या कैदेतून सोडवले... कसे? ते वाचा...

Image result for sonia duhan

ओबेरॉय हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये या तीन आमदारांना ठेवण्यात आले होते. त्यांना कोणाशीही बोलण्यास परवानगी नव्हती. हरियानाच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांची माणसं त्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आली होती. तब्बल 100 ते 150 भाजप कार्यकर्त्या या तीन आमदारांवर लक्ष ठेवून होते. आम्हाला कळलं की, राष्ट्रवादीचे काही आमदार या हॉटेलमध्ये जबरदस्ती ठेवण्यात आले आहेत व त्यांना पुन्हा मुंबईला जायचे आहे. त्यानंतर आम्ही एक रणनिती बनवली व त्यांना तेथून सुखरूप बाहेर काढले, असे सोनिया यांनी सांगितले. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर थरारक अपघात; चौघे जागीच ठार

Image result for sonia duhan

या रणनितीत सोनिया यांच्यासमवेत हरियाना राष्ट्रवादी युवकचे धीरज शर्माही होते. आम्ही दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. त्या तिघांना किंग्डम ऑफ ड्रीम या हॉटेलवर आणण्यात आले. पण आम्ही त्यांना ऑबेरॉय हॉटेलच्या मागील दरवाज्यातून साधारण साडेदहा ते अकराच्या दरम्यान बाहेर काढले. आम्ही त्या हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पोहोचलो. आम्ही 20 ते 25 लोक होतो. आम्ही आमच्या दोन टीम बनवल्या. इतर काही लोक बाहेर थांबवले व गाड्या ठेवल्या गेल्या. यात आम्हाला काही अंतर्गत कर्मचाऱ्यांनी मदत केली. रात्रीच्या दरम्यान भाजपचे जे लोक लक्ष ठेवून होते, त्यांच्याबदल झाले व त्याचाच आम्ही फायदा घेतला. या तीन आमदारांना मागील दरवाज्याने बाहेर काढले व '6 जनपथ' येथे पोहोचलो. रात्रीच जेवण केले व विमानाचे तिकीट बूक केले. सकाळी 5 वाजता आम्ही मुंबईत पोहोचलो, असे सोनिया यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शरद पवारांना भेटल्या तेव्हा पवार सोनिया यांच्या कामावर खूप खूश होते. 

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Duhan rescued 3 MLA Of NCP from Haryana