esakal | सोनियांमुळे सुधारणा सुरुच; वीरप्पा मोईली
sakal

बोलून बातमी शोधा

Veerappa Moily and Sonia Gandhi

सोनियांमुळे सुधारणा सुरुच; वीरप्पा मोईली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काही नेत्यांनी जी-२३ गटाची दिशाभूल केल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली (Veerappa Moily) यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली पक्षात सुधारणा आधीपासूनच सुरु असल्याचे ठामपणे सांगितले. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा पक्षात समावेश करण्यासही त्यांनी भरभरून पाठिंबा जाहीर केला.

गेल्या वर्षी सोनिया यांना संघटनात्मक फेरबदलासाठी पत्र लिहिलेल्या २३ वरिष्ठ नेत्यांमध्ये मोईली यांचा समावेश होता. याच मोईली यांनी या हे व्यासपीठ तसेच प्रशांत किशोर यांच्या अनुषंगाने वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली.

हेही वाचा: एकात्मिक लढाऊ गट नेमण्याचा संरक्षण तज्ञांचा सल्ला

कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, जी-२३ गटाचा काही जणांनी गैरवापर केला. यास कुणी संस्थात्मक स्वरूप देण्याचा अट्टहास करणार असतील तर त्यामागे त्यांचे हितसंबंध असतील. आमच्यापैकी काही जणांनी सोनियांना पाठविल्या जाणाऱ्या पत्रावर सह्या केल्या त्या केवळ पक्षांतर्गत सुधारणा होण्यासाठी, पक्षाच्या विनाशासाठी नव्हे तर फेरबांधणीसाठीच. ज्या क्षणी सोनिया यांनी सुधारणेचा विचार केला त्याच क्षणी आम्ही जी-२३ गटाची संकल्पना बाजूला सारली. आता सोनिया यांनी सुधारणांना प्रारंभ केला असल्यामुळे जी-२० गटाकडे कोणतीही भूमिका उरली नसून तो संदर्भहीन ठरला आहे. यानंतरही कुणी जी-२३ ला धरून राहणार असतील तर त्यांना काँग्रेस पक्षाविरुद्ध त्याचा वापर करायचा आहे. त्यास आमचा पाठिंबा नव्हे तर विरोधच असेल. तसे करणारे काँग्रेस पक्ष आणि त्याच्या परंपरेचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधकांनाच फायदा होईल.

प्रशांत किशोर यांच्याविषयी ते म्हणाले की, त्यांच्या प्रवेशाला ज्यांचा विरोध आहे ते सुधारणाविरोधी आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि प्रत्यक्ष पक्षात आंतरिक सुधारणा कराव्यात, ज्यामुळे खूप फायदा होईल. सोनिया आणि राहुल यांचा सुधारणेचाच उद्देश आहे. प्रशांत किशोर हे रणनीती आखण्यात यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या पुनरागमनासाठी आवश्यक असलेल्या पुनरागमनासाठी ते योजना आणि आराखडा आखू शकतात.

हेही वाचा: काँग्रेसपेक्षा आम्ही सक्षम! ‘आप’ यूपीतील सर्व जागा लढविणार

सोनियांकडून मोठी `शस्त्रक्रिया‘

मोईली म्हणाले की, संघटनेत चैतन्य निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून त्यासाठी सोनिया गांधी यांनी मोठ्या `शस्त्रक्रिये‘चा विचार यापूर्वीच केला आहे. त्या सक्रिय आहेत. त्या आवश्यक ते निर्णय घेत आहेत. पक्षप्रमुख या नात्याने त्यांनी टाकलेल्या पावलांबाबत मी आनंदी आहे.

loading image
go to top