...तर जवान हुतात्मा कसे झाले? चिनी घुसखोरीवरून सोनियांचा थेट मोदींना सवाल

Sonia gandhi directly questions Modi over Chinese infiltration
Sonia gandhi directly questions Modi over Chinese infiltration

नवी दिल्ली- भारत-चीन सीमावादावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले. चीनप्रश्‍नी केंद्र सरकार वस्तुस्थिती दडवून ठेवत असून, यावर जाणीवपूर्वक स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसेल, तर मग २० जवान कसे हुतात्मा झाले, असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. 

मी इंदिरा गांधी यांची नात, कारवाईला घाबरत नाही; प्रियांका गांधींचं सणसणीत उत्तर
सोनिया गांधींनी सरकारला जाब विचारणारा व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात सरकारने आतातरी देशासमोर वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. सोनियांनी सांगितले की, गलवान खोऱ्यात वीरगती मिळालेल्या सैनिकांप्रती देश नेहमीच कृतज्ञ राहील. संपूर्ण देश आणि काँग्रेस पक्ष सैनिकांसोबत उभा आहे. मात्र या संकट काळात सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. पंतप्रधान म्हणतात, की देशात घुसखोरी झालेली नाही; पण संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्रालय मात्र सातत्याने चिनी घुसखोरी झाल्याचे सांगत आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमे देखील उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रे दाखवून घुसखोरीला दुजोरा देत आहेत. 

प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन 

पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, घुसखोरी झालेलीच नसेल तर २० सैनिक कसे आणि का हुतात्मा झाले, चिनी सैन्याने लडाखमध्ये बळकावलेली जमीन सरकार कशी परत मिळवणार, गलवान खोरे आणि पेगाँग त्सो भागामध्ये खंदक तयार करून चीनने आपल्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले आहे काय, असे सवाल करताना सोनिया गांधींनी, या मुद्द्यांवर सरकारने देशाला वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन केले आहे.

भारताचे भूभाग आपल्या नकाशावर दाखवल्यानंतर नेपाळची आता नवी खेळी
राहुल गांधींनीही पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधान म्हणतात की, हिंदुस्थानचा इंचभरदेखील भूभाग कोणीही घेतलेला नाही; परंतु कानावर येणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून दिसते आहे. लडाखची जनता सांगते आहे. लष्कराचे निवृत्त जनरल सांगत आहेत, की चीनने एक नव्हे; तर तीन ठिकाणी आपला भूभाग बळकावला आहे. पंतप्रधानांना आता तरी खरे बोलावे लागेल. देशाला सांगावे लागेल. घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधानांनी उघडपणे सांगावे; परंतु हुतात्मा झालेल्या जवानांना निःशस्त्र कोणी पाठवले. पंतप्रधानांनी यावरही न घाबरता बोलावे. 

दरम्यान, काँग्रेसच्या दैनंदिन वार्तालापादरम्यान पक्षनेते, नेते व माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांनी आज दावा केला की, चीनने देप्सांग भागात १८ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाय जंक्शनमध्ये झालेली ही घुसखोरी देशाच्या सरहद्दीला मोठा धोका आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com