सोनिया गांधी, मनमोहनसिंग तिहारमध्ये; चिदंबरम यांची भेट

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

आज सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या भेटीच्या तपशीबाबत माहिती मिळालेली नाही. यापूर्वी अहमद पटेल आणि गुलामनबी आझाद यांनी चिदंबरम यांची भेट घेतली होती. 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी तिहार कारागृहात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठे नेते पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी आज (सोमवार) सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तिहारमध्ये गेले होते.

चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने अटक केलेले चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत काही दिवसांपूर्वी 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चष्मा आणि औषधेही देण्यात आली आहेत. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी देत चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले होते. चिदंबरम यांना 22 ऑगस्टला अटक करण्यात आली होती.

आज सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या भेटीच्या तपशीबाबत माहिती मिळालेली नाही. यापूर्वी अहमद पटेल आणि गुलामनबी आझाद यांनी चिदंबरम यांची भेट घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi, Manmohan Singh meet P Chidambaram at Tihar Jail