काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा

वृत्तसंस्था
Wednesday, 5 February 2020

सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर डी. एस. राणा यांनी सांगितले, की सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (बुधवार) सकाळी सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी यांना रविवारी सायंकाळी अचानक ताप आल्यानंतर त्यांना श्‍वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर डी. एस. राणा यांनी सांगितले, की सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi stable condition improving says Hospital authorities