Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

Sonia Gandhi Thanks COVID-19 Warriors In A Video Message
Sonia Gandhi Thanks COVID-19 Warriors In A Video Message

नवी दिल्ली : आपण सर्वजण एकत्र मिळून कोरोनाची लढाई लढणं यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते. सुरक्षा उपकरणांची कमतरता असतानाही आपले योद्धा कोरानाविरोधातील युद्ध लढत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वसंरक्षण ड्रेस नसतानाही रुग्णांवर उपचार करत आहेत, असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी सोनिया गांधींनी कोरोनाविरोधातील लढाईत दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसकडून सोनिया गांधींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (ता. १४) देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदींनी संवाद साधण्याआधी सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत त्यांनी देशाला संबोधित केले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी लोकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही केलं आहे.

लॉकडाउन यशस्वी व्हावा यासाठी पोलिस आणि जवान कर्तव्य निभावत आहेत. स्वच्छता कामगार अनेक सुविधा नसतानाही विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी मदत करत आहेत. सरकारी कर्मचारीदेखील महत्त्वाच्या सेवा सुरु राहाव्यात यासाठी मेहनत करत आहेत. पण जर आपण त्यांना पाठिंबा दिला नाही तर ते त्यांचं काम योग्य रितीने करु शकणार नाहीत. डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, हे चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. या लढाईत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

तुमच्यापैकी अनेकजण सॅनिटायझर, रेशनचं वाटप करत वैयक्तिक स्तरावर मदत करत आहात. तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. आम्ही राज्यात सत्तेत असो किंवा विरोधात पण या लढाईत सर्व काँग्रेस कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com