'सोनिया गांधी यांचे गणित कच्चे’

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

नवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे गणीत कच्चे असून, त्यांना आकडेवारी समजत नाही, अशी टिका संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आज (गुरुवार) केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अविश्वास प्रस्तावावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे संकेत दिले होते.

सोनिया गांधी यांना प्रत्युत्तर देताना अनंतकुमार यांनी म्हटले आहे की, 'सोनिया गांधी यांचे गणती कच्चे आहे. त्यांना आकडेवारी समजत नाही. त्यांचे गणित कच्च असल्यामुळे त्यांना योग्य आकड्यांचा मेळ बसवता येत नाही. 1996 मध्येही त्यांनी असेच केले होते. पुढे काय झाले, ते जनतेसमोर आहे. मोदी सरकार बहुमतात आहे. सरकारला संसदेतही समर्थन आहे आणि संसदेच्या बाहेरही मोठा पाठिंबा आहे.'

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर विरोधकांचे मनोबल वाढले आहे. परंतु, आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही, असे अनंतकुमार यांनी म्हटले आहे.

Web Title: Sonia Gandhis Math Weak says Minister Ananth Kumar