मशिदीतील भोंगे म्हणजे धार्मिक सक्ती- सोनू निगम

टीम ई सकाळ
सोमवार, 17 एप्रिल 2017

कोणत्याही धर्माला असा अधिकार नसल्याचे त्याने म्हटले आहे. अशा प्रकारे झोपेतून जागे करणाऱ्या मंदिर आणि गुरुद्वारांवरही माझा विश्वास नाही, असेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

नवी दिल्ली : 'मशिदीमधून सकाळी मोठ्या आवाजात करण्यात येणारे 'अजान' म्हणजे धर्माची सक्ती करणे होय,' असे गायक सोनू निगम याने म्हटले आहे.

'मी मुस्लिम नाही तरीदेखील मला रोज सकाळी 'अजान'च्या आवाजामुळे झोपेतून उठावे लागते. भारतातील या सक्तीच्या धार्मिक रुढी कधी संपणार?' असे ट्विट सोनू निगमने केले आहे.

या सर्व प्रकाराला सोनू निगमने 'गुंडागर्दी' म्हटले आहे. अशा प्रकारे लोकांना सकाळी झोपेतून उठवणे योग्य नाही. कोणत्याही धर्माला असा अधिकार नसल्याचे त्याने म्हटले आहे. अशा प्रकारे झोपेतून जागे करणाऱ्या मंदिर आणि गुरुद्वाऱ्यांवरही माझा विश्वास नाही, असेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सोनू निगमचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत सोनू निगमचे समर्थन करणाऱ्या व विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली.
 

Web Title: sonu nigam annoyed by muslim azaan in masjid