ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा'

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

सोशल मिडीयावर येऊन तरुण-तरुणी दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. माझा कोणताही धर्म नाही. मी प्रत्येक ठिकाणी योग्य ते निवडून धर्माचे पालन करतो. मी डावाही नाही आणि न उजवा. मला दुःख आहे, की मी अशा ठिकाणी आहे जेथे वास्तववादी भूमिका मांडली तर विष पसरविले जाते.

मुंबई - सोशल मीडीया व ट्विटरवर पक्षपातीपणाचा आरोप बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम याने ट्विटरवरील अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अरुंधती राय व जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर आरोप केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यानंतर सोनू निगमने अभिजीत यांचे ट्विटर अकाउंट बंद होत असेल तर शेहला रशीदचे अकाउंट बंद का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. सोनूने सलग ट्विट करून मिडीया आणि ट्विटरवर आरोप करत अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनूने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की माध्यमांनी, ट्विट करणाऱ्यांनी माझ्या ट्विटर अकाऊंटचे स्क्रिनशॉट्स काढून ठेवा. कारण मी फार काळ येथे असणार नाही. ट्विटवरील माझ्या 7 मिलियन फॉलोअर्सला मी अलविदा म्हणत आहे. मला माहिती आहे, माझे फॉलोअर्स निराश होतील, चिडतील. सोशल मीडीयावर येऊन तरुण-तरुणी दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. माझा कोणताही धर्म नाही. मी प्रत्येक ठिकाणी योग्य ते निवडून धर्माचे पालन करतो. मी डावाही नाही आणि न उजवा. मला दुःख आहे, की मी अशा ठिकाणी आहे जेथे वास्तववादी भूमिका मांडली तर विष पसरविले जाते. काही जण मला मुस्लिमविरोधी असल्याचे म्हणत आहेत. ट्विटरची अवस्था अशी झाली आहे, चित्रपटगृहात अश्लिल चित्रपट दाखविला जात आहे. ट्विटरवर प्रत्येकजण उतावीळ आहे. याठिकाणी मुद्देसूद चर्चा का होत नाही. त्यामुळे मी आज ट्विटर सोडण्याचा निर्णय घेत आहे. चांगल्या दृष्टीकोनातून मी हा निर्णय घेतला आहे, थँक्यू ट्विटर.

Web Title: Sonu Nigam decides to quit Twitter and explains why in 24 tweets: 'Need to de-clutter'