...तेंव्हा केंद्रीय संस्था कान धरून तुम्हाला बाहेर काढतील; मोदी सरकारवर ममता भडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Mamata Banerjee

...तेंव्हा केंद्रीय संस्था कान धरून तुम्हाला बाहेर काढतील; मोदी सरकारवर ममता भडकल्या

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसून येतात. कोलकाता येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात ममता यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (mamata banerjee news in Marathi)

हेही वाचा: Javed Akhtar : माझे विचार कधीही देशविरोधी नव्हते...; जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

विरोधी पक्ष आणि अनेक नेत्यांविरुद्ध सीबीआय-ईडी तपासाबाबत ममता म्हणाल्या, आज तुम्ही (भाजप) सत्तेत आहात आणि त्या केंद्रीय एजन्सींची भीती दाखवत आहात. उद्या तुम्ही सत्तेत नसताना या केंद्रीय एजन्सी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचे कान धरून तुम्हाला बाहेर ओढतील, तो दिवस लवकरच येईल, असंही ममता यांनी म्हटलं.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, या लोकांना काय वाटतं चार बाईक घेऊन गेलं म्हणजे आंदोलन होतंय का? पोलिसांना दोन लाठ्या मारल्याने आंदोलन होते का? घरी बसून हिशोब करून आंदोलने होतात का? आज तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही एजन्सीची भीती दाखवली. मात्र उद्या तुम्ही सत्तेत नसाल तेव्हा एजन्सी तुमचे कान पकडून तुम्हाला बाहेर काढेल.

हेही वाचा: Farooq Abdullah: प्रभू श्रीराम केवळ हिंदुंचेच का? ते सर्वांचेच; अब्दुल्ला यांचं विधान

गेल्या काही महिन्यांत ईडी आणि सीबीआयने टीएमसीच्या अनेक नेत्यांना अटक केल्यापासून ममता बॅनर्जी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, भाजप भारतातील इतर पक्षांची निवडून आलेली सरकारे पाडण्यासाठी काळा पैसा आणि केंद्रीय एजन्सींचा वापर करत आहे.