अर्रर्रर्र! टँकरचा स्फोट होताच पाण्यासारखे वाहू लागले 50 हजार लिटर रेड वाईन

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 27 September 2020

या व्हिडिओमध्ये रेड वाईनचे टँकर फुटले आहे आणि 50 हजार लिटर रेड वाइन पाण्यासारखी वाहत असलेली दिसून येत आहे.

नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होतच असतं. त्या व्हिडिओला अनेकजण लाईक, कॉमेन्टस सुद्धा करतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे ड्रिंक्सचे शौकीन असणारे पाहतच राहतील. या व्हिडिओमध्ये रेड वाईनचे टँकर फुटले आहे आणि 50 हजार लिटर रेड वाइन पाण्यासारखी वाहत असलेली दिसून येत आहे. 

 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ रेडिओ अल्बासेट (Radio Albacete) नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा स्पेनचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये रेड वाईन वाहताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, वाईनरी टँक फुटल्यानंतर रेड वाइन त्यातून वेगाने वाहू लागली आहे. तो व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, जणू काही कालवा वाहत असलेला दिसून येत आहे. रेड वाईन पाण्यासारखा पसरून वाहत जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला 49 सेकंदांचा या व्हिडिओने जणू रेड वाईनची लाटच आणलेली आहे. सोशल मीडियाचे अनेक यूजर्स हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. या व्हिडिओवर विविध मजेदार मीम्स देखील बनवल्या जात आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the tanker exploded 50 Thousand liters of red wine began to flow like water