सोपोरमध्ये चकमकीत एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यातील झालुरा येथील मारवल जंगल क्षेत्रात आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक पोलिस जवान हुतात्मा झाला आहे. श्रीनगर पोलिस दलाला या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहिम जोरदार सुरू आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेकवेळा पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे.

Web Title: Sopore: Jawan Martyred in Gunbattle Between Security Forces And Terrorists