सोपटे, शिरोडकरांविरोधी मगोच्या याचिकेवरील निवाडा खंडपीठाकडून राखीव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पणजी (गोवा) : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांचा राजीनामा स्वीकारताना सभापतींनी अवलंबिलेल्या पद्धतीला आव्हान दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवला. 

या दोघांनी सभापतींकडे स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, यासंदर्भातचा पुरावा सादर करण्यास गोवा खंडपीठाने सांगितले होते तो याचिकादार सादर करण्यास अपयशी ठरले.  

कॉंग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना 16 ऑक्‍टोबर 2018 रोजी दिल्लीतील भाजप कार्यालयात नेण्यात आले व त्यानंतर त्यांनी आमदारकीचे राजीनामे फॅक्‍सद्वारे सभापतींच्या कार्यालयात पाठवले. या राजीनाम्यासंदर्भात जराही चौकशी न करता किंवा कोणताही विलंब न लावता ते त्वरित सभापतींनी स्वीकारले.  त्यामळे हा एकूण प्रकार संशयास्पद असल्याने चौकशी करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे युक्तिवाद  अॅड. शशिकांत जोशी यांनी केला तर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या माजी आमदारांची कोणतीही हरकत नसल्यास ही याचिका तग धरू शकत नाही असा सरकारतर्फे युक्तिव्दा करण्यात आला. दोन्ही बाजू एेकल्यानंतर खंडपीठाने निवाडा राखून ठेवला.

Web Title: sopte shirodkar decision on hold by bench