माफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला दिली अन् रक्ताने माखलेल्या चाकूसह त्याला ताब्यात घेतले.

बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला दिली अन् रक्ताने माखलेल्या चाकूसह त्याला ताब्यात घेतले.

संदीप शेट्टी (वय 26, रा. चिक्कलबुरा, उडुपी) या युवकाने दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवले. पोलिसांनी थांबवल्यानंतर तो थांबला अन् शांतपणे म्हणाला, सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे. यावेळी त्याने रक्ताने माखलेला चाकू बाहेर काढून दाखवला. तरुणाची कबुली ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त करत तरुणाला ताब्यात घेतले आणि याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.

संदीपने मित्र आणि व्यवसायिक भागीदार देवराज याच्यावर चाकूने वार केले असून सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संदीपने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देवराजला 1 लाख रुपये दिले होते. मात्र, त्याने पैसे गुंतवले नव्हते. देवराजने हे पैसे परत करण्यास नकार देत पैसे विसरुन जा असे उत्तर दिलं. यावर चिडलेल्या संदीपने चाकूने देवराजच्या पोटावर आणि पाठीवर वार केले. देवराज ओरडल्याचा आवाज ऐकून शेजारचे नागरिक धावत आले. यावेळी घाबरलेल्या संदीपने दुचाकीवरून पळ काढला आणि पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करण्याचे ठरवले होते. त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.'

Web Title: Sorry I just stabbed my friend