सनाने केली सरकारविरूद्ध पोस्ट; सौरव गांगुली म्हणतो, 'ती अजून लहान आहे...'

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

विद्यार्थी आंदोलनाच्या वादात आता नव्याने चर्चा होतीय ती माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना हीच्या पोस्टची.

कोलकाता : नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशातील तरूणाई धगधगत आहे. दिल्लीतील जामिया मिलीया, उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध संपूर्ण देशभरातून झाला. या आंदोलनात सामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूडचे कलाकारही उतरले. या सगळ्या वादात आता नव्याने चर्चा होतीय ती माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना हीच्या पोस्टची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौरव यांची मुलगी सना गांगुली हिने या वादाच्या दरम्यान आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये जो आशय होता, तो लेखक खुशवंत सिंह यांनी लिहिलेला आहे. त्यांचे 'द एण्ड ऑफ द इंडिया' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. यात लिहिले होते की, 'द्वेषाच्या आधारावर सुरू झालेले आंदोलन ही भीती व संघर्षाचे वातावरण असेपर्यंतच सुरू राहते. आज जे असं समजत आहेत की बरं झालं मी मुसलमान नाही असं समजत आहेत ते मूर्खांच्या दुनियेत जगत आहेत. तसेच संघाचे लोक हे नेहमीच डाव्या विचारसरणीच्या व पश्चिम संस्कृतीचा पगडा असलेल्या लोकांवर निशाणा साधत असतात.' अशा आशयाची ती पोस्ट होती. या पोस्टनंतर सौरवने आपल्या मुलीच्या बाजूने ट्विट केलंय.

अक्षय कुमारने लाईक केले भाजपविरोधातील ट्विट अन् मग....

0_121819113725.jpg

सौरव आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'सनाला या सर्व मुद्यांपासून बाजूला ठेवा. ही पोस्ट खरी नाही. ती कोणतेही राजकीय विचार मांडण्यासाठी अजून खूप लहान आहे.' सरकारच्या विरोधात व आंदोलनाच्या समर्थनार्थ सनाने पोस्ट केल्याने सौरवला त्यानंतर ट्विट करून या गोष्टीची सारवासारव करावी लागली. 

Image result for sourav ganguly sana ganguly

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या सरकारविरोधी आंदोलनाचा सर्वात जास्त परिणाम बघायला मिळाला तो सोशल मीडियावर. अनेक बॉलिवूड कलाकार, निर्मात, दिग्दर्शक यांचे जोरदार ट्विटरवॉर झाले. काहींनी सरकारला विरोध केला, तर काहींनी सरकारच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या. त्यात आता सना गांगुलीची पोस्टही व्हायरल होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly say Please keep Sana out of this after daughter posting on CAA