राजकीय पक्षांचे 69% निधीचे स्रोत अज्ञात

पीटीआय
बुधवार, 25 जानेवारी 2017

अज्ञात स्रोतांकडून निधी मिळालेले प्रमुख पक्ष

  1. कॉंग्रेस : 3,323.39 कोटी रुपये
  2. भाजप : 2,125.91 कोटी रुपये
  3. सप : 766.27 कोटी रुपये
  4. शिरोमणी अकाली दल : 88.06 कोटी रुपये

नवी दिल्ली : भारतातील राजकीय पक्षांना एकूण निधीच्या 69 टक्के निधी म्हणजेच 7 हजार 833 कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून मिळाले असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालात समोर आली आहे. सर्वाधिक निधी मिळाल्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष असणारे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष यांचा समावेश आहे.

"असोसिएशन फॉर डॅमॉक्रेटिक रिफॉर्म'ने (एडीआर) 2004-05 ते 2014-15 या कालावधीतील माहितीच्या आधारे अहवाल तयार केलेला आहे. या कालावधीतील राजकीय पक्षांना ज्ञात दात्यांकडून 1 हजार 835.63 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. जो एकूण निधीच्या 16 टक्के आहे.
याचसोबत राजकीय पक्षांचे इतर ज्ञात स्रोतांकडून (मालमत्तांची विक्री, सदस्यत्व शुल्क, बॅंकांचे व्याज, प्रकाशनांची विक्री इत्यादी.) 1 हजार 698.73 कोटी रुपये अर्थात 15 टक्के निधी मिळालेला आहे. बहुजन समाज पक्ष या एकमेव पक्षाला 2004 पासून 2015 पर्यंत सातत्याने ज्ञात स्रोतांकडून मिळालेले उत्पन्न दाखविलेले नाही.
 

    Web Title: source of 69 percent funds of politicial parties unknown