जंगली प्राण्यांनाही शरम वाटेल असे कृत्य; प्रियांका रेड्डी प्रकरणात दाक्षिणात्य कलाकार संतप्त

वृत्तसंस्था
Saturday, 30 November 2019

दाक्षिणात्य कलाकारांनीही भीषण घटनेचा निषेध नोंदवला आहे. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल इतके वाईट हे कृत्य असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलाय.

हैदराबाद : तेलंगणातील शादनगरमध्ये डॉ. प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय तरूणीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी (ता. 27) रात्री घडलेला हा अमानुष प्रकार काल (ता. 29) सर्व देशासमोर आला. देशभरातून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून, अटक केलेल्या चौघांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही होत आहे. अशातच आता दाक्षिणात्य कलाकारांनीही भीषण घटनेचा निषेध नोंदवला आहे. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल इतके वाईट हे कृत्य असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलाय. 

प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरण; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

दाक्षिणात्य कलाकार अर्जून रेड्डी फेम विजय देवरकोंडा, बाहुबली फेम अनुष्का शेट्टी, किर्ती सुरेश यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे महिला सुरक्षेबाबत सवाल केला आहे. 'असुरक्षित ठिकाणी असल्यावर आपल्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला फोनवर बोलावं लागतं, हे भीषण आहे. आपल्या अजूबाजूला जर काही चुकीचे घडत असेल, तर तसे होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे आणि जो चुकीचे वर्तन करतो, त्याला समजावून सांगणे आपले कर्तव्य आहे. जे लोक माणसासारखे वागत नाही, त्यांचा मानवी हक्कांवर अधिकार नाही. आपला जीव महत्त्वाचा आहे. पोलिसांना फोन करण्यास उशीर करू नका, अडचणीत असाल तेव्हा 100/112 नंबरवर कॉल करा.'

ताज्या बातम्यांसाठी वाचा ई-सकाळचे एप

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी म्हणते, 'माणुसकीला हादरवून सोडणारी अशी दुर्दैवी घटना हैदराबादमध्ये घडली आहे. या आरोपींची प्राण्यांशीही तुलना केली तरी, जंगली प्राणीही या कृत्याने शरमतील. या नराधमांना लगेच शिक्षा होईल यासाठी आपण सर्वांनी काहीतरी करायला हवे. प्रियांकाला माझी मनःपूर्वक श्रद्धांजली'

हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या अन् दिल्लीच्या निर्भयाची आठवण!

किर्ती सुरेश म्हणते की, 'हैदराबादला मी सुरक्षित समजायचे. पण या दुर्दैवी घटेनमुळे कोणाला जबाबदार ठरवायचे हेच मला समजत नाही. महिलांच्या सुरक्षेबाबत आपला देश कधी सुरक्षित होणार, या विकृत माणसांना लगेच शिक्षा व्हायला पाहिजे. कर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे.'

डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून जाळून मारण्यात आले. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवालही आला असून, त्यांच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्रियांका म्हणाली, भिती वाटतेय अन् फोन ऑफ झाला...

प्रियांका रेड्डी यांच्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. ट्रकचालकासह त्याच्या क्लिनर्सनेही प्रियांकावर बलात्कार करुन तिची हत्या केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Indian actors expressed their anger for Priyanka Reddy murder case