काँग्रेसमुळे 'सप'ची गच्छंती : मुलायमसिंह

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

राज्यात आज समाजवादी पक्षाची (सप) जी अवस्था आहे, त्यास सर्वस्वी काँग्रेससोबतची आघाडी जबाबदार असल्याचे वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी आज केले. सपला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मैनपुरी - राज्यात आज समाजवादी पक्षाची (सप) जी अवस्था आहे, त्यास सर्वस्वी काँग्रेससोबतची आघाडी जबाबदार असल्याचे वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी आज केले. सपला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

जुनेसा येथे हुतात्मा जवान धर्मेंद्र यादव यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''आपले व समाजवादी पक्षाचे पतन करण्यास काँग्रेसने कोणती कसर ठेवली नाही. आज राज्यात पक्षाची जी स्थिती आहे, त्यास काँग्रेस कारणीभूत आहे. मी अखिलेशला याबाबत कल्पना देऊन आघाडी न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने तो ऐकला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवास जनता नव्हे, तर पक्ष स्वतः जबाबदार आहे.''

बंधू शिवपाल यादव हे नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, ''समाजवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, शिवपाल जे बोलत आहे, त्यात तथ्य आहे. रामगोपाल यादव हे शकुनी असून, शिवपाल यांच्या पराभवासाठी त्यांनी सर्वप्रकारे प्रयत्न केले, त्यासाठी पैसाही खर्च करण्यात आला.''

Web Title: SP defeated because of congress